Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
दिव्य मराठी नेटवर्क नवी दिल्ली, मुंबई, जयपूर, लखनऊ, लुधियाना, भोपाळ, अहमदाबाद  २०११च्या जनगणनेनुसार देशात कोटी ६८ लाख लोक शारीरिकदृष्ट्या अक्षम आहेत. त्यांच्यासाठी लग्न करणे आव्हानात्मक बनले आहे. अपंग, शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी ऑनलाइन वधू-वर सूचक वेबसाइट वाँटेड अम्ब्रेलाच्या म्हणण्यानुसार, केवळ टक्के अपंगांचे विवाह होऊ शकतात. असे असले तरी सेंटर फॉर वुमेन्स डेव्हलपमेंट स्टडीजच्या उपसंचालक रेणू अदलाखा म्हणाल्या, सन २००० च्या राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षणाच्या अहवालानंतर अद्यापपर्यंत अशा लग्नासंबंधी अधिकृत पाहणी झाली नाही. वाँटेड अम्ब्रेलाच्या संचालक कल्याणी खोना यांच्या म्हणण्यानुसार, समाजात अद्यापही अपंगंना लग्नासाठी योग्य मानले जात नाही. त्यामुळेच मॅरेज ब्युरो सुरू केले आहे. लुधियानातील अंकित कुमार आणि संदीप अरोरा यांनीही www.disabledmatrimonial.com ही मोफत वेबसाइट तयार केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांव्यतिरिक्त अनेक स्वयंसेवी संस्था यामध्ये काम करत आहेत. अनेक राज्य सरकारे विवाहासाठी प्रोत्साहन अनुदानही देत आहेत.  जमशेदपूरमधील टाटा स्टीलमध्ये सिनियर मॅनेजर अंध अतुल सहाय म्हणाले, अपंग आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्यांची अपंग मुलीशी लग्न करण्याची इच्छा नसते. मी राजपत्रित अधिकारी असणाऱ्या अनेक अपंग मुली पाहिल्या आहेत. त्यांच्याशी अपंग क्लार्कचीही लग्न करण्याची इच्छा नसते. बहुतांश अपंग महिला आपल्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांशी लग्ने करत आहेत.  राष्ट्रीय सांख्यिकी सर्वेक्षणानुसार, सामान्यांपेक्षा अपंग महिलांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे. विवाहविषयक ऑनलाइन वेबसाइटने २०११ मध्ये केलेल्या पाहणीनुसार, केवळ टक्के महिला आणि १५ टक्के पुरुषांना अपंग जोडीदार हवा असतो. अपंगांसाठी स्वतंत्र वधू-वर सूचक मेळावा आयाेजित केला जातो. मात्र त्यातील यशाचे प्रमाण नगण्य आहे. अहमदाबाद आणि वडोदरामध्ये केवळ अपंगांसाठीचे मॅरेज ब्युरो बंद करणे भाग पडले. सुरतमध्ये दीड वर्षात असे तीन मेळावे झाले, त्यात एकाही अपंग मुलीने सहभाग नोंदवला नाही.  रायपूरच्या चेतना परिषदेचे सत्येंद्र अग्रवाल म्हणाले, डिसेंबरमध्ये झालेल्या मेळाव्यात ३०४ अपंगांना स्वत:ची माहिती देण्यासाठी मंचावर बोलावले होते, त्यातील २८ जणांचीच लग्ने जमली. युवराज आता कॅन्सरग्रस्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार जेट कनेक्ट- ऑन टाइम अराइव्ह : ८८.९२ %  जेट कनेक्ट जेट एअरवेज ग्रुपचा भाग आहे. मुंबई त्याचे हब ओबामा दौऱ्यामुळे द्राक्षे झाली आंबट! अग्नी-५ ची यशस्वी चाचणी ग्रामीण भारतात ऑनलाइन शॉपिंग फीव्हर! पाकला हवी बरोबरी : गार्ड आॅफ ऑनरचे नेतृत्व महिलेकडे द्या सोलापूर