Change Your City
 

Go to Page << Previous1234567...2627Next >>

 
Epaper
 
 
क्विक रिझल्ट  राष्ट्रवादीबरोबर जाण्यास विरोध करणार : आठवले  नािशक  राष्ट्रवादीची विनाअट पाठिंबा देण्याची घोषणा, शिवसेना ऑफरच्या प्रतीक्षेत, भाजपची द्विधा   प्रतिनिधी| मुंबई   महाराष्ट्राच्यानिर्मितीनंतर ६० वर्षांच्या राजकीय वाटचालीत यंदाच्या विधानसभा निवडणुकीने इतिहास घडवला. कधी एकहाती, तर कधी आघाडीच्या रूपाने राज्यावर अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसची सत्ता मोडीत काढून भाजप पहिल्यांदाच सर्वांत मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला. काँग्रेस तिसऱ्या स्थानी फेकली गेली. स्थापनेपासून कायम सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सत्तेपासून दूर राहावे लागले आहे.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठी अस्मिता, काँग्रेस राष्ट्रवादीचा जातीपातींचा खेळ आणि आरक्षणाची गाजरे जनतेला मोहात पाडू शकली नाहीत. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने ६३ जागा जिंकत मोदींचा रथ सिंहासनापासून २३ पावले अलीकडेच रोखला. तथािप, ागावाटपावरून तुटलेली २५ वर्षांपासूनची युती सत्तेसाठी २५ दिवसांच्या खंडानंतर पुन्हा एकदा अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत.   विधानसभेच्या २८८ जागांसाठी बुधवारी मतदान झाले. मतमोजणी रविवारी पार पडली. यात भाजप १२२ जागा घेत २४ वर्षांनंतर शंभरी ओलांडणारा पहिलाच पक्ष ठरला. शिवसेनेने ६३ जागांवर मुसंडी मारली. काँग्रेस ४२ राष्ट्रवादीला ४१ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना-भाजपमधील २५ वर्षांची युती आणि दोन्ही काँग्रेसमधील १५ वर्षांची आघाडी तुटल्यामुळे पंचरंगी लढती रंगल्या. एमआयएमचाही यामुळे चंचुप्रवेश झाला. दरम्यान, निकाल जाहीर होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापनेसाठी भाजपला विनाअट पाठिंबा देण्याची तयारी दाखवली. परंतु भाजपतील काही नेते संघ परिवारातून त्यास विरोध झाला.  भाजप