Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1819Next >>

 
Epaper
 
 
सोलापूर हे सुंदर चादरी, ज्वारीच्या भाकरी आणि चटकदार शेंगा चटणीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध शहर. मात्र, मागील शंभर वर्षांपासून दुष्काळग्रस्त आणि औद्योगिक प्रगती खुंटलेले शहर म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत संगीताचे वातावरण निर्माण करणे, त्याचे संवर्धन करणे ही खरोखर कठीण गोष्ट होती. पण, सोलापुरातील कलाकार आणि रसिक नागरिकांनी संगीत, काव्य, नाट्य या कलांना जीवंत ठेवले. एवढेच नव्हे तर यापुढील काळातही या कलांचे संवर्धन येथे होत राहील अशी खात्री पटवणारे कार्यक्रम आज सोलापुरात होताना दिसून येतात.  नव्या पिढीला शास्त्रीय गायन, लोकसंगीत, शाहिरी कार्यक्रमांबद्दल आस्था आहेच. पण त्यांची पावलं राॅक बँडवर थिरकतात. एकाच पट्टीत गायलेल्या मॅशअप्सवर डोलतात. तोंडाने आवाज करून वाजवल्या   जाणाऱ्या ‘बीट बॉक्सिंग या अनोख्या संगीतावर डोलतात. सोलापुरात हळूहळू हे रॉक बँड कल्चर रूजण्याचा प्रयत्न करतंय. चेसिंग अननोन हे बँड सध्या चर्चेत आहे. आपली वेगळी छाप सोडण्याचा ते प्रयत्न करतंय...