Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
Epaper
 
 
ळघाटात गाेंड, काेरकू अाणि राठिया अशा अादिवासींच्या तीन मुख्य जमाती वास्तव्यास अाहेत. पावणेतीन लाख इतकी या अादिवासींची लाेकसंख्या. त्यापैकी गाेंड समाजातील ठाठ्या हा एक समूह. या समूहाचा दिवाळी हाच मुख्य सण. खरे तर अादिवासींसाठी निसर्ग, त्यांचा व्यवसाय, त्यांची जीवनशैली यानुसार सणांचे महत्त्व ठरते. सगळ्या गावाची गुरे चारणे, हे ठाठ्या जमातीचं उदरनिर्वाहाचं मुख्य साधन. सकाळ झाली, की गुरांना जंगलात न्यायचं की संध्याकाळी थेट परत यायचं, हा त्यांचा दिनक्रम. विश्रांती फक्त दिवाळीची. एरवी, गुरं चारून परतलेल्या ठाठ्या पुरुषाला एक भाकरी भाजी द्यायची, ही इथली प्रथा. काही ठिकाणी धान्य दिले जाते. काही भागांमध्ये मात्र ही पद्धत अाता बदलली अाहे. पैशांच्या स्वरूपात हा व्यवहार अाता व्हायला लागला अाहे.   वर्षभर सामाजिक, सार्वजनिक अायुष्य जगायला मिळणाऱ्या, नातेवाइकांमध्ये ऊठबस करायला मिळणाऱ्या या ठाठ्या समूहासाठी दिवाळी हा एकमेव सण असा असताे, की या वेळी हा समूह खऱ्या अर्थाने एकत्र येताे. नातेवाइकांना भेटताे. इतर समाजाबराेबर सणाचा अानंद साजरा करताे. या समूहाची दिवाळी साजरी करण्याची पद्धतही खूप रंजक. गुरांना ठेवणाऱ्या मालकांच्या प्रत्येक घरातल्या खाेलीच्या भिंती लाल मातीने सारवून त्यावर नक्षी काढली जाते.   Àपानपाहा काश्मीरची वेदना आमची होऊन गेली   धर्मेंद्रप्रतापसिंग