जाहिरात
Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
 
 

मुख्य बातमी

 
हरी नरके    </>‘जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा, असे विधान करणार्‍या प्रकाश आंबेडकरांची हात-पाय, शेंडा-बुडखा नसलेली निर्थक विधाने करण्याची सवय जुनीच आहे. गतकाळात मराठवाडा विद्यापीठाच्या संदर्भात त्यांनी ब्रिटिश तत्त्ववेत्त्याच्या थाटात असेच अज्ञानमूलक विधान केले होते. ते म्हणाले होते, की ‘मराठवाडा नामांतर इश्यू ‘डेड हॉर्ससारखा आहे. म्हणजे मेलेल्या घोड्याला जसे जिवंत करता येत नाही, तसे या प्रo्नावर लढा देऊन तो प्रo्न नव्याने लढता येत नाही..    सुहास सोनावणे  प्रा. अविनाश डोळस  आनंदराज आंबेडकर  X´fa¨fÀfcÂfe IYf¹fÊIiY¸ff³fZ¨f WXfZBÊ»f þfd°fAa°f  Àf³¸ff³ffÀffNXe ªff°f WXïX´ffSX Óff»fe¨f ´ffdWXªfZ...  Xþf°fe¨fe Af¹fOZÔXdMXMXe d¸fMX½ff½fe¨f »ff¦fZ»f  ‘जा तिव्यवस्था नष्ट करण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरून जात हद्दपार करा, ही भारिप- बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली मागणी ऐकून शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना उद्देशून केलेल्या ‘तुमचे सातबाराचे उतारे आम्ही कोरे करून टाकू या अज्ञानमूलक घोषणेची आठवण होते.   अशी हात-पाय, शेंडा-बुडखा नसलेली निर्थक विधाने करण्याची प्रकाश आंबेडकरांची सवय जुनीच आहे. गतकाळात मराठवाडा विद्यापीठाच्या संदर्भात त्यांनी ब्रिटिश तत्त्ववेत्त्याच्या थाटात असेच अज्ञानमूलक विधान केले होते. ते म्हणाले होते, ‘मराठवाडा नामांतर इश्यू ‘डेड हॉर्ससारखा आहे. म्हणजे मेलेल्या घोड्याला जसे जिवंत करता येत नाही, तसे या प्रo्नावर लढा देऊन तो प्रo्न नव्याने लढता येत नाही.   पुढचा त्यांचा जावईशोध होता, ‘रिपब्लिकन चळवळ संपली आहे. एकीकडे शरद पवारांसारखे परिपक्व राजकीय नेते ‘दलितांना आरक्षणाची गरज अजून आहे म्हणतात; तिथे प्रकाश आंबेडकर ‘काही दलितांना आरक्षणाची गरज नाही, अशी अपरिपक्व विधाने करतात. ही चूक थोडीफार उमगल्यानंतर एका मुलाखतीत पल्लवी रेणके यांच्या वक्तव्याचा हवाला देऊन ते म्हणतात, ‘भटक्या विमुक्तांची आता प्रगती सुरू झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांची चिंता लक्षात घेऊन या मार्गाने पुढे कसे जायचे हे निश्चित करावे लागेल. ‘परंतु काही पक्ष, संघटनांनी तुमच्या विधानांना विरोध केला आहे, असे छेडले असता त्यांचे उत्तर आपण सर्वज्ञ आहोत, तथा आपण कसे गूढ बोलतो हे वाचकांच्या मनावर बिंबवण्यासाठी ‘शाळेच्या दाखल्यावरून जातच गेली तर आमच्या सवलतींचे काय? असा प्रo्नही त्यांनी उपस्थित केला. त्याचे स्वागतच आहे. परंतु माझा त्यांना प्रo्न आहे, जर मांडलेल्या प्रo्नावर तुम्ही पूर्ण उपाय शोधलाच नाही तर मग अशी अपरिपक्व विधाने करताच कशाला?   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तसे नव्हते. ते बोलत तेथे त्यांच्या प्रo्नांच्या उलगडीचे सूत्र मांडलेले असायचे. याची ग्वाही पत्रकारही घ्यायचे. 1935 मध्ये त्यांच्या हिंदू धर्म त्यागाच्या घोषणेने खळबळ उडवून दिली होती. म. गांधींसारख्या स्थितप्रज्ञतेसाठी प्रसिद्ध असलेल्या नेत्यालाही त्यांच्या विधानाच्या विरोधात तीन वेळा लेख लिहिण्यासाठी हाती लेखणी घ्यावी लागली होती. 1936 पर्यंत त्यांच्या घोषणेची वावटळ शमली नव्हती. तशात राजा-मुंजे वाद उद्भवला. त्यावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद वल्लभ पंत यांनी काही विपरीत भाष्य केले असता ‘संडे स्टेट्समनच्या संपादकांनी डॉ. आंबेडकरांची बाजू घेत आपल्या अग्रलेखात म्हटले होते, ‘डॉ. आंबेडकर हे घटनात्मक विषयात लुडबुड करणारे कोणी उपटसुंभ नाहीत. त्यांना घटना-शास्त्रांचा विशारद म्हटले तरी चालेल. एखाद्या वेळी एखाद्या मुद्दय़ाचा ते फार आग्रह धरतील, परंतु त्यांच्या ठायी बुद्धीचे मोठे भांडवल आहे. त्यामुळे ते अखंडपणे वादविवाद करण्याच्या सिद्धतेत असतात.. त्यांच्या नातवाच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. ‘समस्या तेथे उपाय हे डॉ. बाबासाहेबांच्या ‘अँनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. या ग्रंथात जातीबद्दल त्यांनी म्हटले आहे, ‘जात ही राक्षस आहे आणि जोपर्यंत आपण या राक्षसाला ठार करत नाही, तोपर्यंत भारत देशात न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण होणार नाही.   जातिअंतासाठी त्यांनी तीन उपाय सुचवले होते. 1) डोळसपणे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या. 2) धार्मिक ग्रंथातील भेदाभेद निर्माण करणारी विधाने काढून टाका, म्हणजे धर्मप्रामाण्यावर आधारलेल्या हिंदू धर्मातील तरुण-तरुणींच्या मनातील भीती निघून जाईल. आणि ते मुक्तपणे एकमेकांजवळ येतील आणि 3) मंदिरातील पुजारी ब्राrाणच असला पाहिजे, हा आग्रह न धरता जन्मजात पुरोहितगिरीची पद्धत बंद करून पुरोहितांचा व्यवसाय सर्व हिंदूंना खुला झाला पाहिजे. जो हिंदू पुरोहिताची परीक्षा देऊन उत्तीर्ण होईल, तो कोणत्याही जातीचा असला तरी मंदिरात पुरोहित म्हणून त्याची नेमणूक केली, तर हिंदू धर्म अधिक व्यापक होऊ शकेल व परिणामी जातींविरहित समाज निर्माण होऊ शकतो.   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या शेवटच्या विचाराला पालवी फुटली ती मार्च 2012 मध्ये. त्याचे असे झाले, केरळमधील अनेक देवालयांच्या ट्रस्टपैकी ‘त्रावणकोर देवालय बोर्ड या धार्मिक संस्थेने आपल्या अखत्यारीतील देवळांमध्ये पुजारी नेमण्यासाठी अर्जात ब्राrाण जातीची अट न घालता मल्याळम भाषेवर प्रभुत्व असणार्‍या आणि संस्कृत मंत्रोच्चारांचा सफाईदारपणे उच्चार करणार्‍या हिंदू तरुणांकडून अर्ज मागवले होते. त्यांना एकूण दोनशे पुजार्‍यांची नेमणूक करायची होती. त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 199 उमेदवारांपैकी निम्म्याहून अधिक उमेदवार मल्याळी दलित तरुण होते..हा डॉ. आंबेडकरांच्या उदात्त व क्रांतिकारक विचारांचा विजय मानला पाहिजे. त्यांनी ‘जाती निर्मूलन पुस्तिकेत मांडलेले विचार आजही आदर्श वाटतात. ‘जातींना धर्माचा आधार आहे म्हणून काही जाती पवित्र व उरलेल्या जाती अपवित्र ठरतात. धर्मशास्त्रे हे काही कायदे नाहीत, अशी लोकांत जाणीव निर्माण करण्यासाठी सर्व समाजाने     (उर्वरित मजकूर पान 4 वर)