Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous1234Next >>

 
Epaper
 
 
अखिल भारतीय मराठीनाट्य संमेलन ९७व्या आकड्यापर्यंत येऊन पोहोचलेे आहे. २०२०मध्ये शतकमहोत्सवी नाट्य संमेलन होईल. या आजवरच्या नाट्य संमेलनांच्या इतिहासामध्ये फक्त सात महिलांना नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. त्यातही महिला नाटककार एकच. त्यांचं नाव गिरिजाबाई केळकर. त्यांना १९२८मध्ये मुंबईत भरलेल्या २३व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. गिरिजाबाई केळकरांना (गिरिजाबाईंनी आयेषा, पुरुषांचे बंड, मंदोदरी, राजकुंवर, वरपरीक्षा, सावित्री, हीच मुलीची आई अशीकाही नाटके लिहिली.) मिळालेले नाट्यसंमेलनाध्यक्ष पद ही तत्कालीनदृष्ट्या अपूर्वाईची घटना होती. गिरिजाबाईंप्रमाणेच मालती तेंडुलकर, आनंदीबाई किर्लोस्कर, उमाबाई सहस्रबुद्धे, पद्मा गोळे आदी महिला नाटककारांनीही आपली नाममुद्रा मराठी रंगभूमीवर उमटवली. मात्र या सर्वांमध्ये एक नाव नेहमीच दुर्लक्षित राहिले. ते म्हणजे, हिराबाई पेडणेकर.   हिराबाई पेडणेकरांचा जन्म (२२ नोव्हेंबर १८८६ - सावंतवाडी) संगीत, नृत्याची जाण असणाऱ्या घराण्यामध्ये झाला, असे त्यांच्याबद्दल मोघम लिहून ठेवले गेले असले, तरी त्यांचा ‘नायकीण असा अगदी स्पष्ट शब्दांत उल्लेख श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी आपल्या आत्मचरित्रात (कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे आत्मवृत्त - प्रकाशक ह. वि. मोटे, प्रकाशन वर्ष - जून १९३५) केलेला आहे. याच ग्रंथात कोल्हटकरांनी हिराबाईंचा उल्लेख हिराबाई जोगळेकर (कारण बाईंचा किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीचे मालक-नट नानासाहेब जोगळेकरांशी स्नेह होता.) असाही केला आहे. हा कोल्हटकरांचा कुत्सितपणा आहे. हिराबाई पेडणेकर या गोव्यातील गोमंतक मराठा समाजाच्या. गोवा, सिंधुदुर्ग, कारवार परिसरातील अनेक मोठ्या देवळांच्या परिसरात कलावंत, देवळी, भावीण, पेरणी, बांदे, फर्जंद, चेडवा अशा देवळात सेवा देणाऱ्या पोटजातींच्या समूहाला ‘देवदासी असं नाव मिळालं.   या समाजातही स्त्रियांना देवाला वाहण्याचा सेषविधी होता. पण तो प्रत्येक बाईला बांधील नव्हता. या समाजात नृत्य, संगीतात मुली वाकबगार असत. या देवदासी समाजातील सर्व पोटजातींमध्ये ऐक्य घडवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून या समाजाचे नाव नाईक मराठा समाज आणि शेवटी गोमंतक मराठा समाज ठरलं. हिराबाई पेडणेकर हा सगळा वारसा घेऊन जन्मल्या, त्यातूनच त्यांच्या ठायी असलेल्या लेखन इतर ललित कलांना प्रेरणा मिळाली.   मुंबईतील मिशन स्कूलमध्ये त्या सातवीपर्यंतच शिकल्या. मुंबई विद्यापीठाला ‘राजाबाई टॉवर बांधून देणाऱ्या धनिक प्रेमचंद रायचंद यांच्या घरात त्या वाढल्या, त्या मावशी भीमाबाईमुळे. मावशीनं या भाचीला मुंबईत आणून शिक्षण दिलं. हिराबाई या गिरगाव इथल्या गांजावाला चाळीत राहात होत्या. न. चिं. केळकर, चिंतामणराव वैद्य, गोविंद बल्लाळ देवल, राम गणेश गडकरी, वि. सी. गुर्जर, रेंदाळकर, बालकवी ठोंबरे, मामा वरेरकर हे याच गांजावाला चाळीचा जिना चढले, ते हिराबाईंचे बैठकीचे गाणे ऐकायला, तेही श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या आग्रहामुळेच. हिराबाईंना मराठी संस्कृत उत्तमरीत्या येत होते. त्याशिवाय हिंदी, बंगाली, इंग्लिश या भाषांचा अभ्यास त्यांनी केला होता. त्या उत्तम कविताही करीत. त्या काळी ‘मनोरंजन आणि ‘उद्यान या दोन प्रसिद्ध साप्ताहिकांत हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होत. त्यात त्यांनी ‘माझे आत्मचरित्र नावाची जी लघुकथा लिहिली होती, त्यामुळे त्यांचा अधिक बोलबाला झाला.  ‘किंग लियर आणि‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे ही अलीकडेच कोल्हापुरात सादर झालेली दोन नाटके कधीची म्हणावीत? कालची की आजची? त्यांतला माहोल वा अनुभवविश्व आपले नाहीय, तरी ती आज का करावीशी वाटतात? भावना वा घटना यांच्या अभिव्यक्तीमुळे? त्यात खरे तर आता काही फारसे नावीन्यच राहिलेले नाहीय. माध्यमांमुळे आता रोज असंख्य घटना आपल्या मेंदूंवर येऊन आदळताहेत! खरे तर आजच्या नाटककारापुढे हा एक प्रश्नच आहे - नुसतेच व्यक्तिगत सुखदुःखांचे अनुभव वा सनसनाटी घटना रंगवण्यात आता काही अर्थच राहिलेला नाहीय. या परिस्थितीचा परिणाम म्हणूनही हल्ली अनेक कथाहीन नाटकांची निर्मिती होत असेल. बरे, त्या दोन नाटकांत कसला परिवर्तनवाद आहे म्हणावे, तर तेही नाही. पिरांदेल्लोप्रमाणेच बेकेट आणि आयनेस्कोही सामाजिक-राजकीय-आर्थिक परिवर्तनासाठी लिहिणारे नव्हते. (आपल्याकडचे शेरेबाज, बेजबाबदार टीकाकार नेमाडे, कारणे वा विश्लेषण देता, बेकेटसारख्या लेखकाला सहज ‘दुय्यम लेखक म्हणतात, ते वेगळे). पण ही नाटके का महत्त्वाची आहेत, याचे उत्तर मी देणार आहे. आजचे एक महत्त्वाचे नाटककार जयंत पवार तुम्हाला माहीत असतील. ‘अधांतर, ‘माझं घर, ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजची एक वेगळीच अडचण मांडली होती. त्यांचे म्हणणे असे की, आजचे वास्तव फार वेगाने बदलते आहे. लेखकाला त्याचे आकलन होऊन तो त्यावर नाटक लिहीपर्यंत ते वास्तव जुने-अप्रस्तुत होतेय! ही तर महा-अवघड समस्या म्हणायला हवी- लिहिणेच अशक्य करणारी! इथे एक प्रश्न विचारला पाहिजे, की आजचे वास्तव म्हणजे काय? आपण ज्याला उत्तर-आधुनिकतावाद म्हणतो, तो ‘सत्य ही कल्पना वा सर्वांना एकच काही जसेच्या तसे कळू शकणेच नाकारतो. ते आपल्याला आपल्या साध्या पद्धतीनेही कळू शकते. प्रत्येकाचा जगण्याचा माहोल, प्रभाव वेगवेगळे असतात. मेंदूतल्या रसायनांचे प्रमाणही वेगवेगळे असते. प्रोग्रॅमिंगच वेगवेगळे असते.   सारांश, प्रत्येकाला दिसणारे, अनुभवाला येणारे वास्तव एकच नसते. आजच्या जगाचा काही एक कॉमन माहोल असला तरीही प्रत्येक लेखकाचे वास्तव वेगळे असते. अमुकच एक वास्तव सत्य, असे काही नसते. त्यामुळे कुठले तरी वास्तव पकडायचे आहे, ही समस्याच मला खोटी वाटते. इथे कॉमन वा सामान्य कारणांनी विचारांचे, समजुतींचे माहोल कसे बदलत जातात, ते थोडक्यात पाहायला हवे. असे केल्याने आजच्या मराठी नाटकाची नीट कल्पना येईल. आपल्या आजच्या नाटकांमधून प्रामुख्याने उत्तर-आधुनिकतेची लक्षणे प्रतीत होतात. आजचे आपले नाटककार आहेत- हिमांशू स्मार्त, आशुतोष पोतदार, गणेश दिघे, अजित देशमुख, दत्ता पाटील, विद्यासागर अध्यापक, मनस्विनी लता रवींद्र, धर्मकीर्ती सुमंत, युगंधर देशपांडे, राहुल बनसोडे आणि संतोष गुजर (ज्यांचे ‘मऊ नावाचे नाटक फार चांगले आहे, असे ऐकून आहे. प्रदीप मुळ्ये यांचे दिग्दर्शन आहे.), याचबरोबर प्रणव सखदेव आणि सतीश तांबे यांच्या कथांची नाट्यरूपांतरेही सादर झालेली आहेत. शिवाय, पु. शि. रेग्यांच्या ‘सावित्री या कादंबरीचे रवींद्र लाख्यांनी सादर केलेले नाट्यरूपांतरही लक्षणीय आहे. तसेच लाख्यांनीच दिग्दर्शित केलेले माझे ‘मनाचे शोक हे नाटक, हेही आपल्या परवानगीने, यात समाविष्ट करतोय.   यांतल्या दत्ता पाटील या नाटककाराबद्दल एक विशेष सांगण्यासारखे निरीक्षण आहे. त्यांचे ‘हंडाभर चांदण्या हे नाटक परिवर्तनवादी, ‘गढीवरच्या पोरी हे उत्तर-आधुनिक, तर ‘स्ट्रॉबेरी हे एक साधे रंजनात्मक व्यावसायिक नाटक आहे. खूप उत्सुकता बाळगावी, असा हा नाटककार आहे. विद्यासागर अध्यापक हा त्याच्या कॉलेज जीवनात बराच काळ माझ्या संपर्कात होता. त्याची दोन व्यावसायिक नाटके अलीकडेच रंगभूमीवर आली. ‘आधी बसू आणि मग बोलू आणि ‘साखर खाल्लेला माणूस. व्यावसायिक रंगभूमीवरची ही दोन वेगळ्या बाजाची नाटके आहेत. त्यांतला अॅब्सर्डिटीचा स्पर्श मस्त खुमारी आणणारा आहे. याच प्रकारे, व्यावसायिक रंगभूमीवर, ‘सुसाट हे एक अगदीच वेगळे, अॅब्सर्ड आणि मजेदार नाटक लिहिले गेले, ते अजित तात्याबा देशमुख या लेखकाकडून. यात प्रत्यक्ष रेल्वे स्टेशन, गाडी येणे-जाणे, तीतून पात्रे चढणे-उतरणे, हे सगळे होते. प्रियदर्शन जाधव आणि सुशील इनामदार यांचा उत्तम अभिनय होता. गणेश दिघे या नाटककाराने कालिदासाच्या ‘मेघदूतचे नाट्यरूपांतर करून ते ‘अपूर्व मेघदूत या नावाने सादर केले. त्याचे अवघड दिग्दर्शन स्वागत थोरात यांनी केले आहे. यानंतर गणेशने यक्ष तिकडे विरह भोगत असताना इकडे यक्षिणीची काय अवस्था होती, याबाबत कल्पना लढवून ‘यक्षिणी विलाप नावाचे नृत्यमय नाटक रंगभूमीवर आणले आहे. अशा नाटकात कसली भूमिका घेणे आणि कसला परिवर्तनवाद असणार? हे तर मानवी जगण्याचे आणि अस्तित्वाचेही भान घेणे आहे. संपर्कात येणाऱ्या मनाला परिपक्व करणारे. याच पद्धतीचे नृत्यमय असलेले असे ‘सावित्री हे नाटक रवींद्र लाख्यांनी सादर केलेले आहे. कलाकृतीतले वास्तव दूरचे वा अपरिचित असले तरी त्या कलाप्रक्रियेतल्या उच्च अशा संवेदनशीलतेमुळे ते कसे आजही आणि सर्व वयोगटांतल्या प्रेक्षकांना प्रस्तुत वाटते, ते पाहण्यासारखे आहे. यालाच म्हणायचे अभिजातता. लाख्यांचे दिग्दर्शन आणि प्रिया जामकर यांचा अभिनय ही या नाटकाची खास वैशिष्ट्ये आहेत. या कादंबरीत वा नाटकात ना आजच्या जगण्यातले अराजकी वास्तव आहे ना परिवर्तनवाद, तरीही आज ते भरभरून पाहिले जाते आहे. यावरून हेच दिसून येते की, आजचे नाटक म्हणजे अमुक सालात, अमुक वयाच्या माणसाने लिहिलेले, अमुक वास्तवाचे नाटक, असे काही नसते.   मनस्विनीला तेंडुलकर ‘एक धाडसी नाटककार म्हणाले. स्त्रियांना असे धाडसी असणे खूप कठीण असते. मनस्विनीची नाटके मुख्यतः आजच्या तरुण पिढीचे अनुभवविश्व हाताळतात. प्रेम, प्रतारणा, फ्लर्टिंग, ब्रेकअप, घटस्फोट यांच्या प्रक्रिया इथे दिसत राहतात. आताच्या पिढीच्या जगण्यातले हे नित्याचे प्रश्न आहेत. मनस्विनी ते अत्यंत निर्भीडपणे हाताळते. अशाच विषयावरच्या तिच्या एका नाटकाचे नाव आहे, ‘सिगरेट‌्स.   धर्मकीर्तीचे ‘पाणी हे नाटक माझ्या मते एक महत्त्वाचे नाटक आहे. या नाटकाला काही जण राजकीय नाटक म्हणतात. आपल्याकडे काही जण एक बावळट कल्पना जोपासतात की, राजकीय म्हणजे काहीतरी ग्रेट असते. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक तसा राजकीय हा फक्त एक माहोल असतो. नाटक हे मानवी संबंधांचेच असावे लागते,