Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
Epaper
 
 
हेमंत करकरे हयात नसल्याचे शल्य...   देशाला सर्वात जास्त ज्यांची गरज आहे, ते हेमंत करकरेंसारखे कर्तव्यदक्ष आणि अत्यंत हुशार अधिकारी आज आपल्यात नसणे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. एक सहृद, मितभाषी आणि प्रसिद्धीपराङ‌्मुख व्यक्ती म्हणून माझ्या मनात त्यांची प्रतिमा आहे. मुंबई शहरात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असल्यापासून माझा त्यांच्याशी परिचय होता. २००७मध्ये मी चीफ पब्लिक प्रॉसिक्युटर पदाचा राजीनामा दिला होता.   साधारण २००८मध्ये अचानक हेमंत करकरेंचा मला फोन आला. काही माध्यमांनी केलेल्या एककल्ली टीकांनी ते व्यथित झाले होते म्हणाले, ‘मॅडम, आपल्यासाठी दहशतवादाशी संबंधित एक आव्हानात्मक केस पाठवत आहे. आपण कागदपत्रे वाचून निर्णय घ्यावा, असे वाटते. मालेगाव बॉम्बस्फोट घटनेसंदर्भातली ती कागदपत्रे होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी सायंकाळी ७.३० वाजता त्यांची-माझी भेट झाली होती. आणि त्याच दिवशी रात्री हेल्मेट घालून जीपमध्ये बसताना त्यांना शेवटचे पाहिले...  रसिक विशेष   प्रशांत दीक्षित