Home >> Magazine >> Rasik
Change Magazine
 

Go to Page << Previous123456Next >>

 
Epaper
 
 
सिक : नेताजी सुभाषचंद्र बोस बेपत्ता झाल्याचे कळल्यानंतर ते सैबेरिया, युरोप आणि अन्य देशांत असल्याची अनेक वृत्तं येत होती. काही जण नेताजी योग्य वेळी भारतात येणार, असेही बोलत होते. तुम्हाला महानायक कादंबरी लिहिताना या विषयाबाबत नेमके काय धागेदोरे सापडले?  उत्तर : माझ्यातर्कानुसार ते अपघातात गेले असावेत. १९९६मध्ये मी जपानमध्ये नेताजींच्या कार्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने गेलो होतो. मला या निमित्ताने तीन मुद्दे सांगायचे आहेत.  एक म्हणजे, जपानमध्ये रेंकोजी टेम्पलमध्ये नेताजींची रक्षा ठेवणयात आली आहे. नेहरूंनी तेथे भेट दिलेली होती. मी त्या मंदिरात गेलो, तिथे मी त्यांच्या बेपत्ता होण्याचा शोध घेतला, पण ते जिवंत असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. नेताजींवर दुसऱ्या महायुद्धामध्ये ऑगस्ट १९४५मध्ये ताईहोकू (तैपेई) येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. या संदर्भातला तेथील डॉक्टरांचा काही पानांचा अहवाल उपलब्ध आहे. त्यामध्ये नेताजींना जखमी अवस्थेत कसे दाखल करून घेतले होते, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली, त्यांना कोणती औषधे किती वेळाने दिली, याबाबत दोन डॉक्टरांचे खुलासेवार तपशील आहेत.  दुसरा मुद्दा म्हणजे, दुसरे महायुद्ध संपल्यानंतर जपानने शरणागती पत्करली होती. त्या वेळी अमेरिकन जनरल मॅक्आर्थर यांनी जपानवर ताबा मिळवला होता. मॅकआर्थर नेताजींच्या शोधासाठी वेडापिसा झाला होता. त्याने जपानमध्ये नेताजींचा कसून शोध घेतला; परंतु खूप प्रयत्नांनंतर त्याचे असे मत बनले की, सुभाषचंद्रांचा मृत्यू विमान अपघातात झाला असावा. त्यांनी तशाप्रकारे लिहिलेला गुप्त अहवाल युद्धकालीन कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे.  तिसरा मुद्दा म्हणजे, १९५१-५२च्या दरम्यान नेहरूसुद्धा काहीसे धास्तावले होते. सुभाषबाबू कदाचित जिवंत असावेत आणि ते परत आले तर निवडणुकीमध्ये वरचढ ठरू शकतील, या विचाराने त्यांनी आणि सरदार पटेल यांनी, १९५१मध्ये एस. ए. अय्यर यांना मुंबई राज्याच्या डायरेक्टर ऑफ पब्लिसिटीचा पदभार दिला. अय्यर यांना पूर्व आशियात नेताजींचा शोध घेण्यासाठी गुप्तपणे पाठवले गेले. अय्यर यांनी नेताजींच्या मंत्रिमंडळात प्रचारमंत्री म्हणून काम केले होते. त्यांनी चार महिने शोध घेऊन एक अहवाल लिहिला होता. हा अहवाल दिल्लीतील त्रिमूर्ती भवनातील ग्रंथालयात उपलब्ध आहे. हे सगळे अहवाल आणि माहिती पाहून मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो की, दुर्दैवाने नेताजींचा अपघातात मृत्यू झालेला आहे.  रसिक: मुखर्जी कमिशनचा नेताजींच्या गूढ मृत्यूबद्दल एक अहवाल आहे, ज्याची चर्चा अधिक चालते. त्या अहवालाबद्दल तुम्ही काय सांगाल?  उत्तर : मुखर्जीकमिशनचा अहवाल मी वाचलेला नाही; पण त्याच्या अगोदरचे शहानवाज कमिटी, खोसला कमिशनचे अहवाल मी वाचले आहेत.  रसिक: विद्यमान भाजप सरकारने नेताजींच्या मृत्यूबाबत ३९ क्लासिफाइड फाइल जाहीर करण्यास नकार दिला आहे, त्या नकारामागचे काय कारण असू शकते? या कागदपत्रांमधील कोणत्या नोंदी सरकारला अडचणीच्या वाटू शकतात?  उत्तर : यानोंदी का जाहीर केल्या जात नाहीत, हे सांगता येणं कठीण आहे. १९६० पर्यंतची सर्व कागदपत्रे क्लासिफाइड झालेली असून ती लोकांसाठी उपलब्ध आहेत. तथापि नेताजी सुभाष आझाद हिंद सेनेबाबतची कागदपत्रे अद्याप उपलब्ध केलेली गेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण मला असे वाटते की, अशा काही व्यक्ती या एकूण प्रकरणाशी संबंधित होत्या, ज्या ब्रिटिशांच्या बाजूने लढत होत्या; पण भारतात सत्तेचे हस्तांतरण झाल्यानंतर त्यापैकी काही जणांना प्रशासनात समाविष्ट करण्यात आले. अशा व्यक्तींचे हितसंबंध वादग्रस्त असू शकतात.  Àपानपाहा पल्याकडे पुराणकाळात लागलेले बहुविध शोध आणि त्याबद्दलची एकाहून एक स्पष्टीकरणे ऐकून चकित होण्याची वेळ आली आहे. प्रभू रामचंद्र हे विमानातून प्रवास करणारे जगातले पहिले प्रवासी असल्याचे वक्तव्य दीनानाथ बात्रा यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. प्राचीन काळात आपल्या पूर्वजांना मूलपेशी अर्थात, स्टेम सेलवर संशोधन सुरू असल्याचे माहीत होते, असाही त्यांचा दावा होता. मात्र, बात्रा यांच्याही पुढे जात मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयाचे उद््घाटन करताना, आपल्या पंतप्रधानांनी आणखी एका ‘वैज्ञानिक सत्याचा उलगडा केला. आजपर्यंत जगातील अब्जावधी लोकांची अशी श्रद्धा होती की, जगातील पहिली शेवटची कृत्रिम गर्भधारणा (व्हर्जिन बर्थ) ही फक्त कॅथलिक धर्मातच झाली होती; पण मला हिंदू पुरातत्त्ववाद्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते की, त्यांनी महाभारतातील कर्ण हा जगातील कृत्रिम गर्भधारणेचे पहिले उदाहरण होते, असे ठामपणे सांगितले. मला असे वाटते की, आपल्या पंतप्रधानांचे गुरू हे बात्राच आहेत. ज्यांचे पुराणातील संशोधन गुजरातमधील शालेय अभ्यासक्रमात मुलांना शिकवले जात आहे, तेच हे बात्रा आहेत.  काय दैवदुर्विलास आहे पाहा. बात्रा यांच्या संस्थेचे नाव शिक्षा बचाओ आंदोलन आहे. आणि जर बात्रा यांचे संशोधन आपण शिकणार असू, तर आपला देश या देशातील युवकांचे भविष्य अंधकारमय आहे, यात मला तरी शंका वाटत नाही.  या मुद्द्याला जोडून एक दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी (जे त्याच पक्षाचे एक नेते होते) एक लक्षणीय निर्णय घेतला. त्यांनी माहितीच्या अधिकाराच्या गाभ्यालाच लक्ष्य केले. आपल्याकडे माहितीचा अधिकार हा सातत्यपूर्ण राजकीय-सामाजिक संघर्षातून लोकांना मिळालेला मोलाचा कायदेशीर अधिकार आहे.  Àपानपाहा महाराष्ट्रीय ग्रंथ  गजूतायडे