Home >> Magazine >> Madhurima
Change Magazine
 

Go to Page << Previous1234567Next >>

 
Epaper
 
 
मृण्मयी रानडे | मुंबई   mrinmayee.r@dbcorp.in     मु लुंडमधल्यामहाराष्ट्र सेवा संघाच्या वातानुकूलित सभागृहात मागच्या शुक्रवारी प्रवेश केला तेव्हा ितथे एक विचित्र कुजबुजपूर्ण शांतता जाणवली. शांतता, कारण ितथे परीक्षा सुरू होती. आिण तरीही कुजबुज होती कारण परीक्षार्थी होती अंध मुलं, जी फक्त आपल्या लेखनिकाला ऐकू येईल इतक्या आवाजात उत्तरं सांगत होती.   महाराष्ट्र सेवा संघ ही पन्नासेक वर्षांपूर्वी स्थापन झालेली संस्था. अनेक उपक्रम या संस्थेतर्फे चालवले जातात. संस्थेचं सुसज्ज असं ग्रंथालयही आहे. तीन वर्षांपूर्वी या ग्रंथालयात काही ब्रेल िलपीतली पुस्तकं आली. त्यांचं नक्की काय करायचं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ग्रंथालय समितीच्या सदस्यांनी सरळ नॅशनल असोसिएशन फाॅर ब्लाइंड (नॅब) या संस्थेशी संपर्क साधला. त्यातून असं लक्षात आलं, की अनेक िवशेषकरून गरीब अंध िवद्यार्थ्यांना दहावीची परीक्षेसाठी मोठ्या मदतीची आवश्यकता असते. बऱ्याच जणांनी शाळा अर्धवट सोडलेली असते, त्यामुळे बाहेरून परीक्षा देण्यासाठी १७ क्रमांकाचा अर्ज शालेय िशक्षण मंडळाकडे भरण्यापासून त्यांचा अभ्यास घेण्याचं काम कोणी तरी हाती घेण्याची गरज होती. यासाठी संघाकडे जागा होती, पण नक्की काय कसं करायचं ते कळत नव्हतं. मग त्यांच्या मदतीला आल्या आशा कणसे. आशाताईंचा मुलगा अंध असल्याने त्यांनी पंधरावीस वर्षांपूर्वी नॅबचाच पॅराप्रोफेशनल टीचिंगचा अभ्यासक्रम केला होता त्या डोंिबवलीत या प्रकारचं काही मुलांना िशकवण्याचं काम करत होत्या.   ही दृष्टिसेवा अभ्यसिका २०१२च्या जुलैमध्ये सुरू झाली. नॅबकडे मुंबईतल्या अंध व्यक्तींच्या नोंदी आहेत. त्यातून शाळा अर्धवट सोडलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांची त्यांच्या पालकांसोबत एक बैठक घेण्यात आली, असं आशाताई म्हणाल्या. मग मुलुंड परिसरात राहणाऱ्या काही महिलांनी िशकवायला यायचं कबूल केलं. यासाठी ग्रंथालयाचे सदस्य महत्त्वाचे ठरले. आठवड्यातून एकदा तरी हे सदस्य ग्रंथालयात येतात, तेव्हा त्यांच्यापर्यंत या कामाची माहिती पोचवणं साेपं झालं, असं या अभ्यासिकेची जबाबदारी असलेल्या नंदिनी हंबर्डे यांनी सांगितलं. हे िशकवणं मनात आलं तेव्हा जाऊ या प्रकारचं नव्हतं, तर आठवड्यातून ठरावीक तास नियमित ितथे जाणं अपेिक्षत होतं. यातील काही जणी िनवृत्त िशक्षिका होत्या, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जणींना अंधांसोबत काम करण्याचा अनुभव होता. परंतु हाती घेतलंय, ते तडीस नेण्याची िजद्द प्रत्येकीकडे होती. मुलांनीही त्यांना खूप मोठी साथ िदली, कारण त्यांच्यासाठी शाळेत पुन्हा जाणं,   >पानपाहा