Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
गाेपाळ राेकडे। भुसावळ   मराठीमनाला चेतवणारा ‘महाराष्ट्र हा शब्द आला कुठून ? याचे कुतूहल अनेकांना असते. बाराशे वर्षांपूर्वीच्या ज्ञात तीन लेखांमध्ये महाराष्ट्र हा शब्द आलेला आहे. या लेखात हा उल्लेख व्यक्तिवाचक की प्रदेशवाचक याबद्दल एकवाक्यता नाही. मात्र, तिघांपैकी एक शिलालेख मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण येथील अाहे. प्रसिद्ध पुरातत्व अभ्यासक डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्या ‘शोधमुद्रा-खंड ३मध्ये मेहुण शिलालेखावर सविस्तर उहापोह केलेला आहे, अशी माहिती मुक्ताईनगर येथील इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. पी. एस. प्रेमसागर यांनी दिली.   मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण हे प्राचीन गाव पूर्वी तापी नदीच्या काठावर उंच टेकडीवर वसले होते. याच टेकडीवर संत मुक्ताबाईंचे मंदिर आणि या मंदिराच्या पूर्वेस सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराजवळ शेतात खोदकाम करताना शिलालेखाची शिळा सापडली होती. ३२ ओळींच्या या शिलालेखात हैहयनामक राजवंशासह राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय आणि शर्व अमोघवर्ष प्रथम यांचे उल्लेख आहेत. या शिलालेखाचे संपादन व्ही. बी. कोलते यांनी व्ही. व्ही. मिराशी आणि अजयमित्र शास्त्री यांच्या सहकार्याने केले होते. त्यावर डॉ. देशपांडे यांनी शोधमुद्रा-खंड ३मध्ये सटिक विवेचन केले आहे. शिलालेखाची भाषा संस्कृत अाहे. शिलालेखाच्या तिसऱ्या चौथ्या श्लोकात हैहयनामक राजवंशाचे वर्णन येते. याच हैहय वंशात प्रतिकंट अथवा महाराष्ट्र आणि त्याचा पुत्र शुभंकंट अथवा स्तंभ हे राजे झाले. त्यांची महती ते १०व्या श्लोकात गायीली आहे.   ऐतिहासिकखान्देश : मेहूणमध्येबदरी नदी (ओढा किंवा नाल्याला बोरी म्हटले जाते. उर्वरित.पान  गतवर्षी भारत बेसावध, यंदा अमेरिका सावध  12.5%   २००८ मध्ये  दीपा कर्माकर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याचे कळाल्यानंतर एवढ्या मोठ्या देशात आतापर्यंत एकही खेळाडू यासाठी पात्र होऊ शकला नाही याचेच नवल वाटले. दीपाच्या यशाचे श्रेय घेण्यासाठी तमाम क्रीडा संघटना पुढे सरसावल्या. या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रातील परिस्थितीवर टाकलेला प्रकाशझोत...  जळगाव