जाहिरात
Change Your City
 

Go to Page << Previous1234567...1112Next >>

 
Epaper
 
 
मतदानाची शाई तयार करण्याचे अधिकार म्हैसूरच्या कंपनीकडेच पंकजकुमार पांडेय.  अमेठी  तुमच्या अनेक कविता आम्ही ऐकल्या आहेत. चार-पाच मुली बाजारात भेटलेल्या कुमार विश्वास यांना सांगतात. अमेठीवर एखादी कविता होऊन जाऊ द्या, अशी फर्माईशही नंतर होते. कुमार विश्वास दीर्घ श्वास घेतात अन् म्हणतात, ऐकवीन, पण अमेठीत बदल घडेल, देशात बदल घडेल, पप्पू फेल होईल अन् जगभरात आनंद साजरा होईल, तेव्हा नक्की ऐकवीन. इतरत्र पैसे घेतो, पण येथे मोफत ऐकवीन. 1000 गावांच्या दौर्‍यानंतर कुमार यांच्याबाबत 70 वर्षीय बाबा राम शिरोमणी म्हणाले, ‘बिटिया एकर कविता सुनिके तू सब जिन पगलाय जाऊ. अबकी लडाई तो बस राहुल और कमल में बा, जितिहै राहुल, भले माजिर्न कम होई जाय.  विश्वास यांच्या दौर्‍यांनी अमेठीत राहुल यांच्या विरोधाच्या वातावरणाचा पाया रचला आहे. आता भाजप मोदी फॅक्टरच्या मदतीने त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे. सपाचा उमेदवारच नाही, पण हत्ती या निशाणीवर डॉ. धर्मेंद्र सिंग सफारीमध्ये फिरत आहेत. पण ते सक्रिय नाहीत. काँग्रेसने इतर पक्षांना शांत केल्याची चर्चा येथे आहे.  मंगळवारी प्रियंका गांधी आल्या. मुन्शीगंज गेस्टहाऊसमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक चालली. कार्यकर्त्यांच्या भरवशावर राहू नका. एक-एक गाव पिंजून काढा. लाटेचा अंदाज आल्यामुळेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना प्रथमच मुलासाठी अमेठीच्या नंदमहरमध्ये सभा घ्यायची गरज वाटली. काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रतापसिंह कबूल करतात की नाराजी आहे. विकास झाला पण पंतप्रधानपदाच्या उमेदवाराकडून असलेल्या अपेक्षांचे कारण ते त्यासाठी देतात.  संग्रामपूरमध्ये दुपारी दोन वाजता पोहोचलेल्या स्मृती इराणी लोकांना विचारतात, तुमच्या नेत्याने येथे एखादे महिला महाविद्यालय काढले? नाही ना? मग त्यांना मत देऊ नका. त्यावर पाया पडत कलिकन धामच्या कमलादेवी म्हणाल्या, दीदी आम्ही तर तुलसीला मत देणार. गणेश राम म्हणाले, दीदी  मोदींची सभा घ्या, वातावरणच बदलेल. प्रियंका यांनी जोरदार तयारी केली. अखेरीस सगळे भावनेच्या आहारी जातात. स्मृती म्हणाल्या, कशाचे भावनिक नाते सांगतात अमेठीबरोबर? सपा, बसपाबरोबर युती करतात. आणि मोदी नक्की येणार. त्यांनी महिलांबरोबर मेंदी लावून प्रचाराला सुरुवात केली. आप काँग्रेसची बी टीम असल्याचे त्या म्हणतात. मी विचारले, तुम्हाला बाहेरच्या उमेदवार म्हटले जाते.. त्यावर लगेचच उत्तर आले, मग काय मॅडम सोनियांचा जन्म इथे झाला आहे का? आता हे काही चालणार नाही, मग मिसेस वढेरा आल्या तरी बेहत्तर.   दुसरे दृश्य :  रात्रीच्या नऊची वेळ. अमेठी बाजारातून पुढे गेल्यानंतर बेसमेंटवर तयार केलेले आपचे कार्यालय आणि तेथे उपस्थित कार्यकर्त्यांचा उत्साह. घोषणा ऐकू येते, अभी तो  उर्वरित. पान 12     शीला हारी है, अब राहुल की बारी है. मी विचारले, तुम्ही राहुलसाठी फारच कठोर भाषा वापरता. त्यावर उत्तर मिळाले, माझ्या मनात तीव्र आक्रोश आणि वेदना आहेत. खूप काही बोलायची इच्छा होते, पण र्मयादा आहेत. मोदींशी सेटिंगबाबत विचारले असता वैयक्तिक मैत्रीचा राजकारणाशी संबंध नसल्याचे सांगतात.  दृश्य तिसरे  अमेठीत राहुल यांचे प्रतिनिधी चंद्रकांत दुबे मुन्शीगंज गेस्टहाऊसमध्ये आहेत. मी विचारले, लोकांमध्ये बराच राग आहे. नेहमीच असतो, पण अखेर अमेठीबरोबर गांधी कुटुंबाच्या भावनिक नात्याचा आणि विकासाचा विजय होतो. अमेठीमध्ये काहीही नव्हते, आज अनेक मोठे प्रकल्प आहेत. जे झाले ते राज्य सरकारांच्या मदतीनेच झाले.  मुस्लिम उमेदवार असता तर अडचण झाली असती  सिंदुरवाचे मोहंमद नियाज सांगतात, 1998 मध्ये बसपाकडून मोहंमद नईम निवडणूक लढले. त्यांना एक लाख मते मिळाली. काँग्रेसचे कॅप्टन शर्मा पराभूत झाले होते. भाजपचे संजय सिंह विजयी झाले होते. त्यामुळे मुस्लिम उमेदवार असता तर काँग्रेसला सोपे गेले असते. विरोधी मते खूप आहेत. अनेक भागांत संघाच्या शाखा भरतात. गांधी कुटुंबाचे व्हीव्हीआयपी स्टेटस काँग्रेसचे यूएसपी आहे.  कमरोलीचे शेतकरी खुशीलाल वर्मा यांच्या मते, काहीही असले तरी या वेळी राहुल यांना घाम फुटणार हे नक्की. प्रियंका यांनी कॅप्टन सतीश शर्मा, मनोज मट्ट, किशोरीलाल शर्मा अशा ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेस सर्मथक गिरीश शुक्ला म्हणाले, राहुल विजयी होतील, पण मताधिक्य घटेल.  लोक काय म्हणतात  जगदीशपूर औद्योगिक परिसरात चार क्रमांकाच्या रस्त्यावर जुन्या भागात शुकशुकाट असतो. याच भागात रुंगटा, रॉक्सी, आस्था, पॅकेजिंग, अँग्रो, ज्ञान पॅकेजिंग अशा कंपन्या होत्या. कर्जबाजारीपणा किंवा सुविधांअभावी सगळ्यांनी काढता पाय घेतला. हाच विरोधकांचा मुद्दा आहे.  आर.सी.मित्र, अध्यक्ष, स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन, सीडा  अनेक तक्रारी आहेत. रस्त्यांची अवस्था वाईट आहे. वीज चार ते सहा तासच असते. पाण्याची सरकारी यंत्रणा नाही. पण केवळ गांधी कुटुंबामुळे अमेठी जगाच्या नकाशावर आहे. त्याच अभिमानाने आम्ही त्यांना मत देतो.  डॉ.आर.डी.मिर्श, मुख्याध्यापक, इंदिरा गांधी पदव्युत्तर महाविद्यालय